breaking-newsराष्ट्रिय

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन कालव्यात कोसळून एकाचा मृत्यू

जम्मू – जम्मू-काश्‍मीरचे नवे उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांच्या ताफ्यातील एक वाहन आज रस्त्यावरून घसरून लगतच्या कालव्यात कोसळले. त्या अपघातात एक जण मृत्युमुखी पडला, तर पाच जण जखमी झाले. सुराम सिंह (वय 50) असे मृताचे नाव आहे. ते राज्याच्या माहिती खात्यात छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. उपमुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी जम्मू शहराबाहेर गेले होते.

तिथून परतताना जम्मूलगत हा अपघात झाला. चालकाच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे अपघात झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने संबंधित अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी जम्मूमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button