breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आरोग्य कर्मचा-यांना दोन हजार टोप्यांचे वाटप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोटरी क्लबच्या वतीने आरोग्य कर्मचा-यांना दोन हजार टोप्या वाटप करण्यात आल्या. हा कार्यक्रम आज चिंचवड येथील केएसबी चौकात घेण्यात आला.

या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, रोटरी क्लब, पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, रोटरी क्लब पिंपरीचे माजी अध्यक्ष सदानंद नाईक, रोटरी क्लब, चिंचवड मोरयाचे माजी अध्यक्ष विनायक घोरपडे, सहा. आयुक्त आशादेवी दुरगुडे तसेच सहा. आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

दिलीप गावडे यांनी आरोग्य कर्मचारी हे स्वच्छता दूत असून त्यांनी काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा, कामाच्या हद्दीतील नागरिकांशी निरंतर संवाद साधुन ओला, सुका व घरगुती घातक कचरा अलगीकरणाबाबत प्रबोधन करण्याच्या सुचना दिल्या. डॉ. अनिल रॉय यांनी सामाजिक उपक्रमात रोटरी क्लबचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याचे नमुद करून आरोग्य कर्मचा-यांनी त्यांचे प्रकृतीची काळजी घेणेबाबत सुचना दिल्या. सहा. आरोग्याधिकारी महादेव शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button