ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्योगनगरीचा पाणीपुरवठा दिवसाआड; महापौरांची माहिती

– धरणात 38 टक्के पाणी साठा

पिंपरी – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 38 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि जूनअखेर पाणी पुरवठा पुरवण्यासाठी 2 मेपासून शहराला उच्च दाबाने दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, याकरिता महापालिकेत सर्वपक्षीय गटनेते,पाणीपुरवठा अधिकारी, जलसंपदा अधिकारी यांची मंगळवारी (दि.25) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाची पाणीसाठा झपाट्याने खलावत आहे. या धरणातून मावळातील गावांनाही पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन होवून जूनअखेर पुरविणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यांच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच, पवना धरणात पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा वगळता धरण परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचाही प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांनाही हे पाणी उपलब्ध करावे लागणार आहे. शहरातील सुमारे 22 लाख नागरिकांच्या जूनअखेर पिण्याचे पाणी पुरवावे लागणार आहे.

याकरिता महापालिका अधिकाऱ्यांनी एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सध्यस्थितीत धरणात 38.37 टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षी एप्रिलअखेर 26.65 टक्के पाणी शिल्लक होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिकच आहे. तरीही पाणी जपून वापरावे लागणार आहे. या शिल्लक पाण्याचे योग्य व काटेकोर नियोजन करण्यासाठी दिवसाआड पाण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. दरम्यान, गतवर्षी उशिरा पाऊस होवूनही पवना धरण 100 टक्के भरले होते.

संबंधितांवर कारवाई करा…
यंदा पिंपरी-चिंचवडसह मावळाला वर्षभर पुरेल एवढे पाणी पुरेल असे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, शहराला दररोज साधारणत: 450 एमएलडी पाणी सोडले जाते. सद्यस्थितीतील शिल्लक पाण्याचा साठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. तसेच, उन्हाळ्यात जलतरण कायम स्वरुपी सुरुच राहणार आहेत. मात्र, पिण्याचे पाणी वापरून सर्व्हिस सेंटर चालू असतील, बांधकामांना पाणी वापरले जात असेल, त्या पाण्याची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याचे आदेशही महापौरांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button