breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
‘ईव्हीएम’बाबत तक्रार घेऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : सर्व विरोधी पक्षांनी आज ईव्हीएम आणि सुरक्षा यंत्रणांबाबत तक्रार घेऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षातील नेत्यांनी आज ही भेट घेतली.
विरोधी पक्षांच्या प्रतिनिधीमंडळामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा समावेश होता. याचबरोबर सिंधिया, ए. के. अँटनी, मल्लिकार्जन खर्गे यांची उपस्थिती होती. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर गुलाम नबी आझाद म्हणाले, देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ताजा असताना निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यसभेच्या संविधानिक स्थितीला बायपास आणि कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण विधेयकांवर बदल केला जात असल्याची टीका त्यांनी केली.