breaking-newsराष्ट्रिय

इस्त्रायलकडून राफेल क्षेपणास्त्र खरेदीचा प्रस्ताव पुन्हा विचाराधीन

नवी दिल्ली – पाकिस्तानविरोधातील लष्करी क्षमता वाढवण्यासाठी भारत इस्त्रायलकडून स्पाइक ही क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या बेतात आहे. या क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानच्या रणगाड्यांना भेदण्याच्या भारताच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये भारतीय संस्था स्वदेशी क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार आहेत. परंतु तोपर्यंत गरज पडली तर रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांसाठी स्पाइकची खरेदी करण्यात येणार आहे.

हा खरेदी करार सध्या अंतिम टप्प्यात असून आता केंद्र सरकारची मंजुरी केवळ शिल्लक असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. भारतीय लष्कराला या प्रकारच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांची निकड असून या वर्षातच इस्त्रायलची कंपनी राफेलशी खरेदी करार केला जाण्याची शक्‍यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. राफेलच्या प्रवक्‍त्याने अशी चर्चा सुरू असल्याच्या वृत्तावर शिक्कमोर्तब केले आहे. मात्र, जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत निश्‍चित माहिती देण्यास नकार दर्शवला आहे.

विशेष म्हणजे, इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यानाहू नवी दिल्लीला भेट देणार आहेत. हा खरेदी करार करण्याचे यापूर्वी ठरले होते, परंतु काही कारणाने तो रद्द झाला होता. याबाबत नेत्यानाहू यांनी मोदींकडे विचारणा केल्यानंतर या चर्चा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

भारताच्या डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) भारतीय बनावटीची रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे बनवण्याचे आश्वासन दिले. ज्यामुळे इस्त्रायलसोबतचा करार मागे पडला होता. भारताला सुमारे आठ हजार रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची आवश्‍यकता आहे. या वर्षाअखेरीस या प्रकारच्या क्षेपणास्त्राची चाचणी डीआरडीओ घेणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्या तर डीआरडीओ 2021 पर्यंत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकेल.

दरम्यानच्या काळात आवश्‍यकता भासल्यास उपाययोजना म्हणून इस्त्रायलकडून राफेलच्या खरेदीचा प्रस्ताव स्वीकारण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button