breaking-newsराष्ट्रिय

इसिस आणि नक्षल कनेक्‍शन-नक्षलवावाद्याकडे सापडली जी-3 रायफल

रायपूर (छत्तीसगड) – इसिस आणि नक्षल कनेक्‍शन दाखवणारी गोष्ट छत्तीसगड पोलीसांच्या हाती लागली आहे, जी-3 रायफल! सुकमा येथील किस्ताराम येथे 3 मे रोजी नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीनंतर पोलीसांना चकमकीच्या ठिकाणी जी-3 रायफल सापडली आहे. किस्ताराम येथे 3 नक्षलवाद्यांचा सफाया केल्यानंतर त्या ठिकाणी सापडलेली ही रायफल म्हणजे नक्षलवाद्यांना परदेशी शस्त्रांचा पुरवठा होत असल्याचा पुरावाच आहे.

सामान्यत: जी-3 रायफलचा वापर इसिसचे दहशतवादी करतात. नक्षलवाद्यांची वापराची शस्त्रे म्हणजे सामान्य रायफल, एसएलआर, इंसास, कार्बाईन आणि पोलीसांची लुटलेली शस्त्रे.

जी-3 रायफल देशात प्रथमच सापडली आहे. जर्मन मेकच्या या रायफलवर हेंकलर अँड कोच कंपनीचे सील आहे. जी-3 रायफलचा वापर देशातील कोणतेही सशस्त्र दल करत नाही.पोलीसांनाही अशा रायफल्स दिल्या जात नाहीत, असे जीएसपी अभिषेक मीणा यांनी सांगितले आहे. जर्मन ऍसॉल्ट रायफलची ही नक्कल असावी असा सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना संशय आहे

जी-3 रायफलमधून 7.62 मिमीच्या मिनिटाला 600 गोळ्या झाडता येतात. या गोळ्यांचा वेग 800मीटर्स/सेकंद असतो आणि हिची मारकक्षमता 200 ते 600 मीटर्स असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button