‘इसिए’तर्फे 18 ते 23 जून दरम्यान पर्यावरण आठवडा स्पर्धा

पिंपरी – पर्यावण संवर्धनाचे संस्कार व्हावेत या भावनेतून पर्यावरण संवर्धन समितीतर्फे (इसिए) पिंपरी-चिंचवड शहरासातील शाळांसाठी 18 ते 23 जून दरम्यान पर्यावरण आठवडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दिली.
अनेक वर्षांपासून शहरातील सर्व शाळांमधून पर्यावरण संवर्धना बाबत सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शाळांसोबत कार्यरत राहून पर्यावरण संवर्धन समिती यशस्वी होत आहे. शहरातील पर्यावरण संवर्धन कामातील सर्व शाळांचा पुढाकार लक्षात घेता, त्यांना सकारात्मक पाठिंबा व शाबासकी देण्यासाठी पर्यावरण आठवडा स्पर्धा 18 ते 23 जून 2018 आयोजित केली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण संवर्धनाच्या धोरणांना ताकद व पाठींबा देण्यासाठी शहरातील सर्व शाळातून पर्यावरण आठवडा साजरा होणे बाबत आम्ही प्रयत्नशील आहोत, असे समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.