breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट, टोल आणि पार्किंगमध्ये सवलत

नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना हिरवी नंबरप्लेट दिली जाणार आहे. टोल तसेच पार्किंगमध्येही सवलत दिली जाणार आहे. याबाबत केंद्रिय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगळ्या ओळखीसाठी देशातील सर्व राज्यांना पत्र लिहून निर्देश जारी केले आहेत.

 

केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावे आणि वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहनांना वेगळी ओळख देण्यासाठी नंबरप्लेट हिरव्या रंगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर नंबर पांढऱ्या रंगात लिहिला जाणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी राज्यांना पत्र लिहिले आहे. यासंदर्भात नीती आयोगाने केंद्र सरकारसाठी एक प्रस्ताव तयार केला होता. यात केंद्रातील सात मंत्रालय पॉवर, रोड, हेवी इंडस्ट्रीझ यांची मदत घेतली आहे.

सध्या देशात खासगी वाहनांसाठी पांढरी, टॅक्सीसाठी पिवळी, स्वतः चालक असलेल्या भाड्याच्या वाहनांसाठी काळी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी निळी नंबरप्लेट असलेली वाहने आहेत. कंपन्यांच्या कार ज्या शोरूम आणि टेस्ट ड्राईव्हसाठी वापरल्या जातात त्यांच्यासाठी लाल रंगाची नंबरप्लेट देण्यात आली आहे. खासगी टॅक्सीसाठी वापर होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना पार्किंग आणि टोल माफी करण्यात येणार आहे. हा फायदा या वाहनांना होण्यासाठी त्यांची नंबरप्लेट हिरव्या रंगाची असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button