breaking-newsआंतरराष्टीय

इन्स्टाग्राम होणार अधिक फ्रेंडली…

नवी दिल्ली : इन्स्टाग्राम हे जगभरात वापरले जाणारे अॅप्लिकेशन आहे, हे अॅप भारतातही कमी काळात तितकंच प्रसिद्ध झालं. त्यामुळे आपल्या युजर्सना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या दृष्टीने ही अॅप्लिकेशन्स पुढाकार घेताना दिसतात. आपल्या प्रतिस्पर्धी अॅप्सना टक्कर देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून इन्स्टाग्रामनेही काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

नुकताच इन्स्टाग्रामने आपल्या फिचर्समध्ये एक महत्त्वाचा बदल करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार एखादी पोस्ट करताना तुम्ही विशिष्ट कॅटगरीची निवड करु शकता. सध्या इन्स्टावर असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या कलेक्शनला कोणताही योग्य पॅटर्न नाही. फोटग्राफी, ट्रव्हल, सेलिब्रेटीज, फॅशन अशा कोणत्याही ठराविक कॅटेगरीज सध्या नाहीत. त्यामुळे युजर्सच्या आवडीनिवडीचा विचार न करता अनेक गोष्टी कशाही दिसतात. मात्र आता या नवीन फिचरमुळे अॅप्लिकेशन अधिक ऑर्गनाईज दिसण्यास मदत होईल. याबाबतची पोस्ट फेसबुकने प्रसिद्ध केली आहे.

याशिवाय हॅशटॅगचा वापर करुन विशिष्ट गोष्टीची तुम्ही कॅटगरीनुसार निवड करता येईल. यामध्ये हॅशटॅग नसलेलीही एक कॅटगरी असेल. कॅटगरी सिलेक्ट करण्यासाठी युजर्सला उजवीकडील किंवा डावीकडील टॅब स्विप करावी लागेल. त्यावरील सर्व कॅटेगरी अतिशय ऑर्गनाईज असतील. इंस्टा अत्यंत पर्सनलाईज, युजर फ्रेंडली करण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button