breaking-newsराष्ट्रिय
इंडिगो विमानाचे इर्मजन्सी लॅंडिंग

नवी दिल्ली – दिल्लीहून रांचीला निघालेल्या इंडिगो विमानाचे एक इंजिन बिघडल्याने या विमानाला दिल्ली विमानतळावर पुन्हा परतावे लागले. या विमानाचे खराब झालेले इंजिन बंद करून वैमानिकाने दुसरे इंजिन सुरू करून विमानाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवले. विमानात एकूण 190 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ए-320 निओ जातीचे हे विमान होते.
विमानाचे प्रॅट ऍन्डी व्हिटनी बनावटीचे इंजिन आयत्यावेळी बिघडले. या इंजिनाविषयी पहिल्यापासूनच तक्रारी आहेत. विमानाने रांचीसाठी उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानात बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने हे इंजिन बंद करून दुसरे इंजिन सुरू केले आणि त्या आधारे त्याने इर्मजन्सी लॅंडिंग केले. इंडिगोच्याच एका विमानात याच जातीच्या इंजिनात गेल्या शनिवारी बिघाड झाला होता.