ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आश्वासनांच्या आठवणीसाठी…चिंचवडमध्ये सर्वपक्षीय विरोधकांचे उपोषण

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न 
पिंपरी :  लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षियांच्या  ”आश्वसनांची आठवण’ उपोषणाला आज (बुधवारी) सकाळपासून सुरुवात झाली आहे. चिंचवड स्टेशन येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय अधिवेषनालाही सुरुवात झाली आहे. 
चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून ‘आश्वसनांची आठवण’ उपोषणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन, माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, विनया तापकीर, पोर्णिमा सोनवणे, माजी नगरसेवक व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मारुती भापकर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस फजल शेख, विजय लोखंडे, स्वराज अभियानाचे मानव कांबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, भारिपचे देवेंद्र तायडे, एमआएमचे शब्बीर शेक, आरपीआय (कवाडे) गटाचे रामदास ताटे, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी, शेतकरी कामगार पक्षाचे हरेश मोरे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी बिग्रेडचे अभिमन्यू पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, ओबीसी संघर्ष समितीचे विशाल जाधव, माकपचे अमित कांबळे, गणेश दराडे, आनंदा यादव, तानाजी खाडे उपोषणाला बसले आहेत.  भाजपची बैठक संपेपर्यंत उपोषण करण्यात येणार आहे.
राज्यातील शेतक-यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या निर्णयाबाबत स्पष्टता यावी, सरसकट शास्तीकर माफ करण्यात यावा, मराठी, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, शहरातील गोरगरीबांना किमान शासकीय व महापालिकेच्या योजनेअंतर्गत किमान 500 चौरसफुटांची घरे मिळावीत, न्यायालयात जाऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थींना घरांपासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी त्याबाबत जाहीर खुलासा करावा, या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button