breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आर्थिक दुर्बल घटकातील पाच विद्यार्थ्यांना घेतले दत्तक ; सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार याचा उपक्रम

शैक्षणिक शूल्काचे विद्यार्थ्यांना धनादेश केले सुपूर्द

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दुर्दम्य इच्छाशक्ती असून देखील त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाच विद्यार्थिनींना दत्तक घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून युवा शक्ती फाऊंडेशनच्या संचालिका ऐश्वर्या पवार आणि ललिता पवार यांच्या हस्ते शैक्षणिक खर्चाचे धनादेश विद्यार्थिनींना सुपूर्द करण्यात आले आहेत.

शिक्षणाची आवड असताना काही विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बलतेमुळे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. परिणामी, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्रथम वर्ग अथवा द्वीतीय वर्गातील शासकीय अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावते. शैक्षणिक काळातील पुरेशा आर्थिक सहायाअभावी त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण प्राप्त होते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती ओळखून त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी समाजातील आर्थिक दृष्ट्या प्रबळ व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज असते. ही बांधिलकी ओळखून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतकार्य करण्याची तत्परता दाखविली आहे. त्यासाठी त्यांनी पाच विद्यार्थिनींना दत्तक घेतले आहे.

आकुर्डी येथील सरस्वती माध्यमीक विद्यालयाची मोहिनी बसवराज गाडेकर, मॉडर्न कॉलेजची आकांक्षा अंबादास जोगदंड, चिंचवड येथील कै. नागनाथ मारुती गडसिंग (गुरूजी) ज्युनिअर कॉलेजची सुजाण मुस्तफ शेख या विद्यार्थिनींना पक्षनेते एकनाथ पवार यांनी दत्तक घेतले आहे. युवा शक्ती फाऊंडेशनच्या वतीने त्यांना शैक्षणिक शूल्काचे धनादेश संचालिका ऐश्वर्या पवार,ललिता पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले आहेत. यावेळी माजी नगरसेवक विश्वास गजरमल, विद्यार्थिनींचे पालक आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button