breaking-newsपुणे

आयटी कंपनीतील 6 कर्मचारी अटकेत

पुणे – मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना समज देण्यासाठी गेलेल्या पोलिसाला धक्‍काबुक्‍की करण्याची घटना हडपसर भागातील अमानोरा पार्कमध्ये घडली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली.

अभिषेक जेमिनी (वय 24), चंदन भंडारी (वय 24), अमनदीप शर्मा (वय 27), उत्कर्ष शर्मा (वय 24), रोहित वांगणु (वय 30, सर्व रा. अमानोरा व्ही कंट्री टॉवर, हडपसर) राकेश शर्मा (वय 28, रा. निसर्ग सिटी, काळेवाडी फाटा, वाकड), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी आयटी कंपनीतील कर्मचारी आहेत. पोलीस शिपाई हनुमंत दुधभाते (वय 24) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्ही कंट्री टॉवरमधील सदनिकेत काही युवक गोंधळ घालत असल्याची तक्रार रहिवाशांनी शनिवारी रात्री केली. नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या सुचनेनंतर, पोलीस शिपाई दुधभाते, आकाश गायकवाड तेथे गेले. दुधभाते आणि गायकवाड यांनी सदनिकेत असलेल्या युवकांना समज देण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यांनी पोलिसांशी अरेरावीची भाषा केली. तसेच हुज्जत घातली. अभिषेकने दुधभाते यांच्या गणवेशाची कॉलर पकडून धक्‍काबुक्‍की केली. सहायक पोलीस निरीक्षक के. एस. लोंढे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button