breaking-newsराष्ट्रिय

आयएएस अधिकारी वाचणार मोदींच्या भाषणांचे पुस्तक

जयपूर : राजस्थानामधील आयएएस अधिकाऱ्यांना भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर आधारित पुस्तकाचा अभ्यास करावा लागण्याची शक्यता आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना सुशासनावर आधारित केलेल्या भाषणांवर एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ‘चिंतन शिबीर’ असे या पुस्तकाचे नाव असल्याचे राजस्थान सरकारचे कार्मिक सचिव भास्कर सावंत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सावंत यांनी हे पुस्तक गुजरात सरकारला पाठवले असून सरकारच्या औपचारिक स्वीकृतीनंतर आयएएस अधिकाऱ्यांना ते पुस्तकं वितरीत करण्यात येतील. सन २००१ ते २०१४ या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी केलेल्या भाषणांचे हे संकलन आहे. यामध्ये त्यांनी सुशासन, निर्णय क्षमता, वेळेचे नियोजन आदी विषयांवर भाष्य केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button