breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘आयएएएस’ अधिका-याला लाच घेतांना अटक

ठाणे : आश्रम शाळेतील भ्रष्टाचाराचा आणखीन एक पाढा समोर आलाय. आदिवासी विभाग अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे ( IAS ) आणि उपआयुक्त किरन माळी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने  १२ लाखांची लाचघेतांना शहापूर येथे रंगेहात अटक केली आहे.

थेट आयएएएस अधिका-याला लाच प्रकरणी अटक झाल्यानं खळबळ उडाली आहे. शहापूर येथील आश्रम शाळेतील ११ अधिक्षकांचं प्रमोशन झाले होतं. मात्र प्रमोशनची ऑर्डर नीट हवी असल्यास प्रत्येकाकडून प्रत्येकी १ लाखांची मागणी झाली होती. ११ अधिक्षकांच्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने सापळा रचून अटकेची कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button