महाराष्ट्र

आमदार निवासात सामूहिक अत्याचार

नागपूर: सिव्हिल लाइन्समधील आमदार निवासात १७ वर्षीय मुलीवर दोघांनी चार दिवस सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी सराफासह दोघांना अटक केली आहे. मनोज भगत (४४ रा.गिट्टीखदान) व रजत मद्रे (१९ रा. पागलखाना चौक),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मनोज याचे गिट्टीखदान चौकात सिटी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी भगत याच्या दुकानात काम करते. १४ एप्रिलला दुकान बंद होते. सायंकाळी मनोज हा पीडित मुलीच्या घरी गेला. आम्ही सर्व कुटुंब भोपाळ येथे जात आहोत, ‌मुलीलाही सोबत पाठवा, असे तो मुलीच्या नातेवाइकांना म्हणाला. मुलीच्या नातेवाइकांनी मुलीला त्याच्यासोबत जाण्यास परवानगी दिली. दोघेही घरून निघाले. मात्र भोपाळला न जाता दोघेही कारने आमदार निवास येथे आले.

आमदार निवासाच्या पार्किंगमध्ये कारमध्येच मनोज याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आमदार निवासात खोली भाड्याने घेतली. तेथेही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रजत यालाही मनोज याने आमदार निवास येथे बोलावून घेतले. दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर चार दिवस अत्याचार केला. १७ एप्रिलला तिला घरी सोडले. १८ एप्रिलला मनोज हा पुन्हा तिथे गेला. तो दारू प्यायला होता. पुन्हा मुलीला सोबत भोपाळला न्यायचे असल्याचे त्याने सांगितले. मात्र मुलीच्या आईने नकार दिला. त्यावर चार दिवस ती कुठे होती हे तुम्हाला माहिती आहे का?, असे सांगून मनोज तेथून परतला. मुलीच्या आईने तिला विचारणा केली. मुलगी घरून निघाली. आईने शोध घेतला असता ती आढळून आली नाही. तिच्या आईने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली. संशयाच्या आधारे पोलिसांनी आधी मनोज याला ताब्यात घेतले. दरम्यान ती रजत याच्यासोबत असून, आग्रा येथे जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन रजत यालाही अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button