breaking-newsमहाराष्ट्र
आमचा अजेंडा आम्ही ठरवणार ‘ते’ नाही- संजय राऊत

मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आपला मित्रपक्षच राहील, अशी ग्वाही भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल ‘मातोश्री’ भेटीत दिली असल्याचे सांगण्यात येत असलं तरी, शिवसेना स्वबळावर निवडणुका लढण्यावर ठाम आहे. अमित शहा यांचा अजेंडा आम्ही जाणून आहोत. त्यामुळे पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा ठराव पक्षाने केला आहे. काहीही झालं तरी त्यात बदल होणार नाही. आमचा अजेंडा आम्ही ठरवणार ते नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
शिवसेनेनं पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे. शहा यांच्या अजेंड्याविषयी आम्हाला माहिती आहे. पण आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा ठराव केला आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही, अशी ठाम भूमिका राऊत यांनी मांडली. एका पक्षाचा ठराव दुसरा कोणताही पक्ष ठरवू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.