breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आबासाहेब पाटील यांची छावा संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

पुणे –  अखिल भारतीय छावा संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून आबासाहेब पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. छावा संघटना व मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करण्यासोबतच या संघटनांच्या नावाचा उपयोग करून खिसे भरण्याचे काम केल्याबाबत तक्रारी आल्याने छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी आबासाहेब पाटील यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे.
नानासाहेब जावळे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १८ जुलै रोजी बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरु केलेले ठिय्या आंदोलन कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यास विचारात न घेता स्थगित केले. यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाचे मोठे नुकसान झाले. तसेच हे आंदोलन स्थगित करताना स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले. याबाबतच्या तक्रारी संघटनेकडे आल्यामुळे शनिवार (२७ ऑक्टोबर) रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत आबासाहेब पाटील यांना छावा संघटनेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नानासाहेब जावळे यांनी पत्रकात म्हटले आहे, छावा संघटना व मराठा क्रांती मोर्चाशी यापुढे आबासाहेब पाटलांचा काहीही संबंध राहणार नाही, असेही जावळे पाटील यांनी म्हटले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button