breaking-newsआंतरराष्टीय

आपला पासवर्ड लवकर बदलण्याचे ट्‌विटरचे 33 कोटी युजर्सना आवाहन

वॉशिंग्टन(अमेरिका) – आपला पासवर्ड लवकर बदलण्यासाठी ट्विटरने 33 कोटी युजर्सना आवाहन केले आहे. अंतर्गत तपासात कोणी युजर्सच्या पासवर्डची चोरी करण्याचे अथवा त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार उघडकीस आलेले नाहीत. तर काही तांत्रिक बिघाडांमुळे सावधगिरी म्हणून आपला पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले असल्याचे ट्‌विटरने स्पष्ट केले आहे. तांत्रिक बिघाडाचा परिणाम किती जणांच्या पासवर्डसवर झाला याबद्दल काही माहिती ट्टिटरने दिलेली नाही. मात्र अशा प्रकारची समस्या पुन्हा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे ट्विटरने स्पष्ट केले आहे.

केंब्रिज ऍनेलिटिका घोटाळ्यात फेसबुकनंतर आता ट्विटरवरही संशयाचे वारे वाहत आहेत. ट्विटरमधूनही डाटा चोरी झाली असल्याचे आरोप माध्यमांनी केले असले, तरी ट्विटरने ते फेटाळले आहेत. केंब्रिज ऍनेलिटिकासाठी टूल्स बनवणाऱ्या अलेक्‍झांडर कोगन यांनी सन 2015 मध्ये मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटकडून डाटा खरेदी केला होता. कोगनने जीएसाअर (ग्लोबल सायन्स रिसर्च) ची स्थापना केली होती. या युनिट्‌मधून ट्विटरवरची माहिती मिळत होती. मात्र याबाबतीत ट्विटरच्या नीतिनियमांचे आपण उल्लंघन केलेले नाही असे कोहने चे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button