breaking-newsक्रिडाराष्ट्रिय

आपच्या आतिशी यांना अश्रू अनावर! गौतमवर ‘गंभीर’ आरोप

आप या नेत्या आणि उमेदवार आतिशी मार्लेना यांनी माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे उमेदवार गौतम गंभीर यांच्यावर केलेले आरोपही गंभीर स्वरूपाचे आहेत. गौतम गंभीर यांचे समर्थक काही पत्रकं वाटत आहेत. या पत्रकांमध्ये माझ्या जातीबाबत, माझ्या आई वडिलांबाबत, माझ्याबाबत अपशब्द वापरण्यात आले आहेत असा आरोप आतिशी यांनी केला आहे. आतिशी मार्लेना यांना पत्रकार परिषदेत रडूही कोसळले. जी पत्रकं माझ्याविरोधात वाटली जात आहेत ती वाचणंही लज्जास्पद आहे असंही आतिशी यांनी म्हटलं आहे.

Embedded video

ANI

@ANI

AAP East Delhi LS seat candidate Atishi breaks down during a press conference alleging BJP’s Gautam Gambhir of distributing pamphlets with derogatory remarks against her says,”They’ve shown how low they can stoop.Pamphlet states that ‘she is very good example of a mixed breed’.”

1,575 people are talking about this

जेव्हा गौतम गंभीर देशासाठी खेळत असत तेव्हा त्यांनी चौकार, षटकार मारल्यावर सगळेच टाळ्या वाजवत असे. मात्र गौतम गंभीर यांची महिलांसाठीची मानसिकता इतकी खालच्या पातळीची असेल असं वाटलं नव्हतं असंही आतिशी यांनी म्हटलं आहे. जर अशा मानसिकतेच्या लोकांना मतं मिळाली आणि ते निवडून आले तर ते महिलांच्या सुरक्षेबाबत किती सजग रहातील? असाही प्रश्न आतिशी यांनी विचारला.

निवडणूक प्रचार करताना भाजपा किती खालच्या पातळीला जाऊ शकतं हे दाखवून दिलं. माझ्याबाबत काही पत्रकं वाटली जात आहे. या पत्रकांमधूनच भाजपाची महिलांबाबतची मानसिकता लक्षात येते असंही आतिशी यांनी म्हटलं आहे. मला पैसा आणि प्रसिद्धी हवी आहे म्हणून मी राजकारणात आलेली नाही. मला समाजबांधणीसाठी काही योगदान द्यायचं आहे म्हणून मी राजकारणात आले आहे. माझ्याबद्दल पत्रकांमध्ये जे लिहिलं जातं आहे ते धक्कादायक आणि हीन मानसिकतेचं आहे असंही आतिशी यांनी म्हटलं आहे. याचवेळी त्यांना रडूही कोसळलं

काय लिहिले आहे पत्रकात?
आतिशी यांचे वडिल जाट आणि आई पंजाबी आहे. आतिशी यांनी एका ख्रिश्चन माणसाशी लग्न केले. आतिशी यांचा नवरा बीफ इटर आहे. आतिशी मार्लेना या मिक्स्ड ब्रीडचं उत्तम उदाहरण आहे असाही उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे. आतिशी जेव्हा त्यांच्या तारूण्यात होत्या तेव्हा त्या आंध्र प्रदेशातील एका खेडेगावतल्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांना याच शाळेच्या शिक्षकासोबत शरीरसंबंध ठेवताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. हे आणि असे अनेक आक्षेपार्ह उल्लेख यामध्ये करण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button