Mahaenews

‘आधी पुनवर्सन मगच कारवाई ; टपरी हातगाडी पंचायतीचा महापालिकेवर मोर्चा

Share On
पिंपरी-  संत तुकारामनगर येथील अधिकृत टप-यांवरील कारवाईच्या निषेधार्थ टपरी, हातगाडी पंचायतीच्या वतीने आज (सोमवारी) महापालिका भवनावर मोर्चा काढण्यात आला आहे.  टपरी व्यावसायिकांनी बंद ठेवून संत तुकारामनगरपासून महापालिका भवन असा मोर्चा काढला. पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चामध्ये यावेळी प्रल्हाद कांबळे शहर अध्यक्ष रमेश शिंदे, धर्मराज जगताप, बळीराम काकडे, माऊली शिंदे, पवन परदेशी, संतोष परदेशी, प्रकाश बाळ, नियाज देसाई, हेमंत मोरे, विजय शिंदे आदी सहभागी झाले होते.
प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संत तुकारामनगर, महेशनगर, वल्लभनगरमधील टप-यांवर महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करुन विस्थापित केले जात आहे. संत तुकारामनगर परिसरात तीन दिवस कारवाई करुन लायसन्स धारक टपरी हातगाडी धारकांना विस्थापित करण्यात आले आहे. राजकीय दबावापोटी ही कारवाई करण्यात येत आहे.  ”आधी पुनवर्सन मगच कारवाई”, ”अतिक्रम कारवाई थांबलीच पाहिजे”, ”हॉकर्स झोन झालेच पाहिजेत”, ”टपरी, पथारी, हातगाडी धारकांना पक्के गाळे मिळालेच पाहिजेत”, ”ख-या गरजू टपरी, पथारी, हातगाडी धारकांचा सर्व्हे करा” अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

Exit mobile version