आधी कर्जमाफी करा…मग काय बोलायचे ते बोला: अजित पवार

मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय…आणि आमचे मुख्यमंत्री ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ अशी जाहिरातबाजी करीत आहेत. अगोदर राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. मग, काय बोलायचे ते बोला…असा घणाघात माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, यासह अन्य मागण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकरी संघर्ष यात्रा सुरु केली आहे. यावेळी मुंबईत झालेल्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनः विरोधकांवर फटकेबाजी केलीय.
सत्ताधारी पक्षाचे नेते फोडाफोडीचे राजकारण करून मित्रपक्षाच्या नेत्यांवर दबाव आणत आहेत, मात्र फुटणारे फुटतील ते पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांसारखे आहेत. अशी टीका अजित पवार यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे नाव न घेता यावेळी केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या चाय पे चर्चा, मन कि बात या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम लावलाय, पण पहिल्यांदा कर्जमाफी करा मग तुमच्याशी काय बोलायचे ते बोलू असा टोला अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.