आदर्श आचार संहितेचे पालन करत पार्थ पवार यांनी पनवेलमध्ये केली प्रचाराची संगता

पनवेल, (महा-ई-न्यूज) – आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज पनवेल कामोठे येथे काढण्यात आलेल्या रॅलीला कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. खासदार सुप्रिया सुळे या देखील रॅलीत सहभागी झाल्या होत्या. पार्थ पवार यांचा विजय असो… अशा घोषणा देऊन आदर्श आचार संहितेचे पालन करत रॅलीची सांगता करण्यात आली. मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (दि. 28) मतदान होणार आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कावाडे गट) आणि मित्र पक्षाच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचार्थ आज पनवेल येथील कामोठे परिसरात रोड शो करण्यात आला. सकाळी आकरा वाजता दुचाकी रॅलीला सुरूवात झाली. यावेळी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद इंदुराव, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, युवा नेते मल्हार पाटील, कोकण विभागाचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पारणेरचे युवा नेते निलेश लंके आदी सहभागी होते.
तिस-या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. सायंकाळी पाचपर्यंतच प्रचाराची मुदत असल्यामुळे उमेदवार पार्थ पवार यांनी दुपारीच प्रचार आवरता घेतला. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होता कामा नये, अशा सूचना पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांना सकाळीच दिल्या होत्या. अत्यंत शांततेत ही रॅली पार पडली. पार्थ पवार यांच्या संपर्क कार्यासमोर रॅलीची दुपारीच सांगता करण्यात आली.