breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती

नवी दिल्ली : येत्या १ मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत.

देशातल्या पाच शहरात ही योजना एक मे पासून आंतरराष्ट्रीय दरानुसार दररोज इंधनाचे दर बदलतील. एकदा प्रणाली यशस्वी झाली की ती देशभरातही लागू करण्यात येणार आहे.

सध्या सरकारी इंधन वितरण कंपन्या दर पंधरा दिवसांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दरानुसार निश्चित करतात. १ मे पासून पुद्दुचेरी, विशाखापट्टणम, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदीगडमध्ये पेट्रोल डिझेलचे दररोज बदलतील, असं इंडियन ऑलईल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी अशोक यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, या निर्णयामुळे पेट्रोलपंप चालक संभ्रमात असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ‘फामपेडा’चे अध्यक्ष उदय लोध यांनी दिलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button