breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आग्र्याहून सुटका’ नाटकाचा शनिवारी रोप्यमहोत्सवी प्रयोग

पिंपरी – मराठी ऐतिहासिक नाट्य पंरपरेतील ‘आग्र्याहून सुटका’ या महत्त्वपूर्ण नाटकाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने येत्या शनिवारी (दि. 26) पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले रंगमंदिरात रोप्य महोत्सवी प्रयोग सादर केला जाणार आहे.

आग्र्याहून सुटका या नाटकाने प्रतिकूल परस्थितीत अनंत अडचणींवर मात करीत रौप्य महोत्सवापर्यंत मजल मारली. ज्या पिंपरी-चिंचवडमध्ये या नाटकाची सुरुवात झाली. तिथेच हा रौप्य महोत्सवी प्रयोग होणार आहे. शिवाजी महाराजांच्या नावाच्या उच्चारानेच अंगात वीरश्री संचारते. असाच एक चित्तथरारक नाट्यनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. हा प्रयोग शनिवारी सायंकाळी पाच वाजता नटसम्राट निळु फुले रंगमंदिरात होईल. याला राजकीय, सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. भाग्यवान रसिकांना एक आठवण भेट देऊन गौरविले जाणार आहे. तेव्हा हा नाट्यप्रयोग बघण्यासाठी रसिकांनी आवर्जून यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button