breaking-newsराष्ट्रिय
आईच्या प्रियकराकडुन मुलीस मारहाण

सातारा : आई व प्रियकर यांच्यात असलेले प्रेमसंबंध घरात वडिलांना सांगु नये यासाठी आई व आईच्या प्रियकराने मारहाण केल्याचा तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आझादनगर, शाहूपुरी येथे राहणाऱ्या एका महिलेचे संजय जाधव रा. मोळाचा ओढा याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू होते.
याची माहिती मुलीला समजल्याने तिने याबाबत वडिलांना काही सांगू नये यासाठी त्या युवतीच्या आईने लाटने, पट्ट्याने तर त्या प्रियकराने लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची तक्रार पिडीत युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिल्यानंतर मारहाण करणारी आई व प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.