breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अहमदनगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ‘द फिशरमॅन्स डायरी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

अहमदनगर – जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांमध्ये चित्रपट संस्कृती रुजावी, सोबतच चित्रपट क्षेत्र भरभराटीला यावे, या हेतूनं ‘अहमदनगर फिल्म फाऊंडेशन’ची स्थापना झाली. जगभरातील दर्जेदार चित्रपटांना अहमदनगरवासियांना आस्वाद घेता यावा, यासाठी फाऊंडेशनने ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अहमदनगर’ (IFFA – इफ्फा) आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गौतम मुनोत प्रॉडक्शन्स एलएलपी ने प्रेरणा, पाठिंबा आणि सर्वतोपरी मदत केली.

यंदाच्या महोत्सवात मध्य आफ्रिकेतील कॅमेरून देशातून आलेल्या ‘फिशरमन्स डायरी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार; तर जर्मनीतील ‘ऍज द वेव्ह ब्रोक’ या लघुपटाला ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याबाबत बोलताना या महोत्सवाचे सर्वेसर्वा गौतम मुनोत यांनी या महोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अहमदनगरचा प्रमुख उद्देश हा वेगवेगळ्या देशांतील तसेच निरनिराळ्या संस्कृतीं मधील दर्जेदार आर्ट फिल्म्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे तसेच उत्तमोत्तम आणि कलाकारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. मागील तीन वर्षांपासून या महोत्सवाला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी तिसऱ्या पर्वासाठी जगभरातील ५० देशांमधून तब्बल २८५ चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये चित्रपट, माहितीपट, लघुपट, ॲनिमेशनपट प्रकारांचा सहभाग होता. सहभागी चित्रपटांपैकी बहुतेकांना यापूर्वीच समीक्षकांनी नावाजले होते आणि त्यांना पुरस्कारही प्राप्त झाला होता.

करोनाकाळात अहमदनगरमधील महोत्सवात जगभरातून सहभागी झालेल्या दर्जेदार चित्रपट कलाकृती आणि महोत्सवाची सर्वत्र वाढत असलेली लोकप्रियता कौतुकास्पद आहे. यावर्षी महोत्सवासाठी “Love for cinema will never change” म्हणजेच चित्रपटांवरील प्रेम कधीही बदलणारे नाही, अशी ती थिम होती.

याबाबत बोलताना गौतम मुनोत म्हणाले, ‘‘करोनाच्या परिस्थिती मुळे सर्वांनाच चित्रपट किंवा कलाकृतींचं महत्व उमजलं आहे, घरी बसून सर्वांनीच चित्रपट पाहिले आहेत. यावर्षी महोत्सवाचे पब्लिक स्क्रिनिंग जरी करता आले नसले, तरीही पुढच्या वर्षी मात्र मोठ्या स्वरूपात फेस्टीव्हल होईल’’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

नामवंत चित्रपट समीक्षक संतोष पठारे यांनी या महोत्सवासाठी ज्युरी म्हणून काम पाहिले. ते म्हणाले, ‘‘इफ्फामध्ये अनेक उल्लेखनीय आणि उत्कृष्ट चित्रपटांच्या प्रवेशिका सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे विजेते निवडण्यासाठी केवळ एकच सर्वोत्कृष्ट चित्रपट किंवा लघुपट निवडणे अतिशय आव्हानात्मक काम होते.’’

इफ्फाचे मुख्य आधारस्तंभ विराज मुनोत व प्रशांत जठार म्हणाले, ‘‘इफ्फामध्ये दरवर्षी चित्रपटांची संख्या वाढत आहे. सध्याची करोनाची परिस्थिती वाईट आहे. मात्र, तरीही आम्ही या चित्रपट महोत्सवाची व्याप्ती आणि स्वरुप आणखी मोठे करण्याचा प्रयत्न करत आहोत. गौतम मुनोत प्रोडक्शन्स एलएलपी यांचा आम्हाला कायमच पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे आम्हाला आणखी उत्साहाने काम करण्यासाठी बळ मिळत आहे. अखिल भारतीय चित्रपटाच्या महामंडळानेही या प्रक्रियेसाठी आम्हाला मदत केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. याशिवाय, असंख्य जणांनी आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरुपात मदत केली आणि करत आहेत. तसेच सर्वांत महत्वाचे म्हणजे अहमदनगरसह संपूर्ण राज्यभरातील चित्रपट रसिक आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आम्ही या सर्वांच्या ऋणात आहोत.’’

 

या वर्षीचे विजेते चित्रपट जानेवारी २०२२ मध्ये होणाऱ्या चौथ्या पर्वाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अहमदनगरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सारंग देशपांडे, क्षमा देशपांडे, अक्षय देशपांडे, प्रा.डॉ.कौस्तुभ यादव, अनुज नवले, सिध्दी कुलकर्णी, सिद्धांत खंडागळे, वसी खान, श्रीपाद कुलकर्णी, शुभम पोपळे, सिद्धी कुलकर्णी , दुर्गेश निसळ, तेजस्विनी देशपांडे, पोपट पिटेकर, आदी पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील होते.

 

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल च्या 2020- 2021 मध्ये मिळालेली पारितोषिके पुढीलप्रमाणे –

इफ्फा सर्वोत्कृष्ट चित्रपट : द फिशरमॅन्स डायरी
देश : कॅमरून

इफ्फा सर्वोत्कृष्ट लघुपट:
ॲज द वेव ब्रोक : जर्मनी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button