अहमदनगरमध्ये इंजेक्शन घेऊन डॉक्टरने केली आत्महत्या

अहमदनगर : शहरातील मार्केट यार्ड भागातील फाटके हॉस्पिटलमधील डॉ. महेश महादेव राऊत यांनी जांघेत इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी नऊ वाजता हा प्रकार उघडकीस आला. राऊत हे भुलतज्ञ्ज्ञ होते. भुल देण्यासाठी वापरण्यात येत असलेले दोन औषध एकत्र करून इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली हे औषध ही पोलिसांना मिळाली आहेत.
आत्महत्याकरण्यापूर्वी राऊत यांनी सुसाइड नोटही लिहून ठेवली होती. वैयक्तिक अडचणी व आर्थिक अडचणीतून आत्महत्या करत असून, कोणाला जबाबदार धरू नये, असे सुसाइड नोटमध्ये म्हटलेले आहे.
सकाळी हॉस्पिटलमधील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला एका खोलीचे दार बंद आढळले. कर्मचाऱ्याने जोरजोरात दार वाजविले. परंतु दरवाजा उघडला नाही. कर्मचारी दरवाजा तोडून आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळाल्यानंतर कोतवालीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी व इतर कर्मचारी हे घटनास्थळी गेले.
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हेही घटनास्थळी आले. डॉक्टरांनी आत्महत्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यानूसार आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचे दिसून येत असल्याचे माहिती पोलिस निरीक्षक रत्नपारखी यांनी दिली. राऊत यांची पत्नीही भूलतज्ञ्ज्ञ असून, त्याही एका हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहेत.