breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘अस्सल सोन्याला आगीची भीती नसते’ – कोल्हे समर्थकांनी फेसबुकवर पत्र लिहून स्पष्टीकरण

पुणे – शिरुर लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हेंची संपत्ती 5 कोटी रुपये आहे, तर मग त्यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेसाठी त्यांनी घर गहाण ठेवल्याची अफवा असल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं होत. या प्रकरणावरुन कोल्हेंना ट्रोलही करण्यात आलं. मात्र, याबाबत कोल्हे समर्थकानेही फेसबूकवर पोस्ट लिहून पत्राद्वारे खुलासा करीत स्पष्टीकरण दिले आहे.

फेसबूक पोस्ट जशीच्या तशी…

”आढळरावांचे लावारीस अंध भक्त डॉ अमोल कोल्हेंवर आरोप करताना देवाने दिलेल्या मेंदूचा बिलकुल उपयोग करताना दिसून येत नाही. डॉ अमोल कोल्हे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता दोन्ही मिळून ४ कोटीच्या आसपास आहे. यातील स्थावर मालमत्ता वडिलोपार्जित असून सरकारी नियमांनुसार त्यांची चालू बाजारभाव किंमत देण्यात आली आहे. डॉ अमोल कोल्हे मुंबई मधील घराचे जॉईंट ओनर असून त्यांच्या पत्नी सुद्धा घराच्या ओनर आहेत आणि त्यांनी ते सारस्वत बँक मधून हौसिंग लोण घेऊन घेतलेलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी कधीही सांगितलं न्हवतं कि त्यांनी शिवसेनेच्या खासदाराकडे मदत मागितली म्हणून, ते पुणे जिल्ह्यातील एक खासदार अस नेहमी म्हणाले, परंतु शिवसेनेचे खासदार जेवढ्या तत्परतेने या विषयावर प्रतीउत्तर देताना दिसतात याचं नेमके कारण स्वतः शिवसेनेच्या खासदारांनाच ठाऊक असेल. चोराच्या मनात चांदणं असा तर प्रकार नाही आहे ना हा नक्की.

राहिली गोष्ट डॉ अमोल कोल्हे यांनी स्वतःहून कधीच घर विकल्याचं भांडवल केलं नाही. त्यांच्या रेकॉर्ड झालेल्या फोन कॉल मधून आपल्या सर्वाना हि गोष्ट समजली. त्यांनी स्वतःही कधी कुठल्याही व्यासपीठावरून हि गोष्ट सांगून भांडवल केली नाही किंवा करणार पण नाहीत. आढळराव तुमच्या आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या संस्कृती खूप फरक आहे ते आम्ही कित्येक वेळा पाहिलं मग ते जातीचा उल्लेख असो किंवा स्टेजवर महाराजांच्या पुतळ्यासमोर चपला घालून बसणं !

अढळसेना संभाजी महाराज आणि अमोल कोल्हे यांचा एवढा तिरस्कार करते कि यांनी सिरीयल बंद व्हावी व अमोल कोल्हेंवर कारवाई व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. ह्यांना अमोल कोल्हे यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? शिवसेनेकडे प्रचारासाठी शिरूर च्या विकासासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नाही आहे म्हणून ते डॉ अमोल कोल्हेंवर वैयक्तिक आरोप करून जनतेची दिशाभूल करतायेत. आढळरावांना शिरूर च्या जनतेला स्वतःचे कर्तृत्व सांगण्यासारखे काहीच नसल्याने आणि त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागल्याने अश्या वैचारिक दिवाळखोरीतून ते आता चाललेले आहेत. देव त्यांना मानसिक स्वास्थ्य देवो !

अस्सल सोन्याला आगीची भीती नसते जेवढी आग जास्त तेवढी झळाळी जास्त !
ता.क. डॉ. अमोल कोल्हे यांनी विकलेल्या घराचा पत्ता
K-10 आंबेकर नगर
परळ गांव, मुंबई 12
स्थानिक नगरसेवक आमदार खासदार शिवसेनेचे आहेत, हवे असल्यास खात्री करून घ्यावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button