Views:
101
कोरापूत : हल्ली लोक कुठे सेल्फी काढतील ते सांगता येत नाही. जखमी अस्वलासोबत सेल्फी काढण्याचा मोह मात्र एका टॅक्सी ड्रायव्हरच्या जिवावर बेतला आहे. ओडिशामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. जखमी अस्वलासोबत सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या टॅक्सी ड्रायव्हरला अस्वलाने हल्ला करून ठार केले आहे.
प्रभू भारता असे या टॅक्सी ड्रायव्हरचे नाव आहे. जखमी अस्वलाच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. ओडिशातील नबारंगपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास प्रभू भारता हा टॅक्सी ड्रायव्हर पापडाहंडी या ठिकाणाहून परतत होता. त्याच्यासोबत इतर काही लोक होते. जंगलात ड्रायव्हरने गाडी थांबवली. त्याचवेळी त्याला तिथे जखमी अस्वल दिसले. त्यानंतर प्रभू भारताला अस्वलासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. चवताळलेल्या अस्वलाने या ड्रायव्हरवर हल्ला केला आणि त्याला ठार केले. एका इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
Like this:
Like Loading...