breaking-newsमनोरंजन

असा असणार ‘सुपर30’ चित्रपटात ऋतिक रोशनचा लुक

मागील वर्षी ‘काबिल’ या सिनेमामधून ऋतिक रोशन चाहत्यांच्या भेटीला आला होता. सध्या ऋतिक रोशन ‘सुपर 30’ या चित्रपटामधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी ऋतिक रोशन खास मेहनत घेत आहे. याकरिता ऋतिक रोशन त्याच्या लूकपासून बॉडी ट्रान्सफर्मेशनवरही मेहनत घेत आहे. ‘सुपर 30’ मधील भूमिकेसाठी ऋतिक रोशन  खास मेहनत घेत आहे. त्याचे खास फोटोदेखील व्हायरल होत आहेत.

सध्या सोशल मीडियावर ऋतिकचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ऋतिक रोशनचा खास लूक दिसत आहे. या फोटोमध्ये मॅथेमेटीशन आनंद कुमारप्रमाणे ऋतिक दिसत आहे.  ऋतिक अत्यंत साध्या वेषात दिसत आहे. अत्यंत साधी पॅन्ट, शर्ट, हाफ़ स्वेटर ऋतिकने घातला आहे. अनेकदा ऋतिक क्लिन शेव्ह दिसतो. मात्र या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन खास मिशीमध्ये दिसत आहे. ‘जोधा अकबर’नंतर पुन्हा ऋतिक अशा खास अंदाजात दिसणार आहे.

‘सुपर 30’ या सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करणार आहेत. हा चित्रपट 2019 साली रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कहाणी प्रसिद्ध गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. ऋतिक रोशनसोबत या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे. पुढील वर्षी 25 जानेवारीला हा सिनेमा रिलिज होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button