breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पिंपरीत 89 अवैध टप-यावर कारवाई ; – सत्ताधा-यांवर कारवाई अन्ं विरोधकांना संरक्षण

– महापालिका अतिक्रमण पथकावर पक्षपातीपणाचा आरोप

पिंपरी- पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील फूटपाथवर उभारलेल्या सर्वच टप-या अनधिकृतपणे चालविल्या जात आहेत. त्या उभारलेल्या टप-या कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाहासाठी उभारण्यात आलेल्या आहेत. पंरतू, मागील तीन दिवसापासून अवैध टप-यावर महापालिका अतिक्रमण निर्मुलन पथकांकडून धडक कारवाई सुरु आहे. या कारवाईत तब्बल 89 अनधिकृत टप-या हटविण्यात आल्या तर 15 टपरी मालकांनी स्वतःहून काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने कारवाई करताना पक्षपातीपणा करीत असून विरोधी नगरसेवकांच्या अवैध टप-यांना संरक्षण दिल्याचा आरोप भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांनी केला आहे.

संत तुकाराम नगर येथे महापालिकेच्या ह व फ अतिक्रमण निर्मुलन पथकांच्या वतीने अवैध टपरीधारकांवर धडक कारवाई सुरु आहे. ही कारवाई 3 मेपासून सुरु करण्यात आली. अतिक्रमण पथकाने कुठलाही पुरावा नसलेल्या 89 टपरीधारक, हातगाडे, पत्राशेड, टेम्पो चालकांवर कारवाई केली. तर 15 टप-या मालकांनी स्वतःहून काढल्या घेतल्या. आजही अवैध टप-याचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतू, हफ्तेवसुली बंद होईल या भितीपोटी टपऱ्यावरील कारवाई रोखण्यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरु आहे. त्या सर्वांचा त्रास कारवाई करताना पथकातील कर्मचा-याना होवू लागला आहे.
संत तुकाराम नगरमध्ये नागरिकांची सतत वर्दळ असल्याने लोकप्रतिनिधीच्या आर्शिवादाने टपरीनगर बनले होते. लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी दिसेल मोकळा फुटपाथ टाक टपरी असे धोरण अवलंबिले होते. त्या टप-या कार्यकर्त्यांनी भाड्याने देवून हप्तेगिरी थाटली आहे. त्यामुळे अवैध टप-यांचा प्रश्न ऎरणीवर आला होता. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संत तुकाराम नगरचा सर्व्हे करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्व्हे करुन टप-यावर कारवाईची मोहीम हाती घेतली. ज्या टपरीधारकांकडे महापालिकेचा कुठलाही पुरावा नाही, अशा टपऱ्या, हातगाडे, पत्राशेड, टेम्पोवर कारवाई कऱण्यात आली. संबंधित टप-यांना पंधरा दिवस अगोदर मार्क केला होता. काही टपऱीधारकांकडे 2005 पूर्वीची जुनी लाईसन्स असल्याने त्यांना या यादीतून वगळण्यात आले. तर 2012 ते 2014 या कालावधी केलेल्या कारवाई प्रसंगी काही टपरीधारकांनी पालिकेत अर्ज करुन लाईसन्स काढले होते. मात्र, अनेक जण पात्र असुनही त्यांना लाईसन्स दिले नाही, त्यांनाही यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार ही कारवाई कऱण्यात आली, अशी माहिती ह प्रभाग अधिकारी आशा राऊत यांनी दिली. यावेळी अतिक्रमण निर्मुलन पथकांच्या कर्मचा-यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता टपरीधारकांवर कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button