Mahaenews

अवैध टपरीवर कारवाई करताना मालकांचा अडथळा

Share On

राजकीय पक्षातील कार्यकत्यांच्या टप-यांना अभय

पिंपरी-  पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे अवैध टपरीधारकांवर अतिक्रमण पथकांच्या वतीने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईची पुर्वकल्पना संबंधित टपरीचालकांना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. परंतू, आज (गुरुवारी) अवैध टपरीधारकांवर कारवाई सुरु करताच त्या टपरीच्या मालकांकडून कारवाई करताना अडथळा आणला जात आहे. तसेच काही संघटनाचे पदाधिकारी, टपरी मालक, विविध पक्षाचे कार्यकर्ते देखील अवैध टपरीवर कारवाई करु नये, याकरिता अतिक्रमण पथकांच्या अधिका-यांना दमदाटी करु लागले आहेत. त्यामुळे अतिक्रमण पथकाच्या कर्मचा-यांना कारवाई करताना अडथळा होवू लागला आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील संत तुकाराम नगर परिसरात अवैध टपरी टाकून मंथली भाडे गोळा करणा-याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या परिसरात महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, डॅा. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि आभियांत्रिकी महाविद्यालय सुरु आहे. यामुळे संत तुकाराम नगरमध्ये सतत रुग्णांचे नातेवाईक, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांची वर्दळ कायम असते. या वर्दळीमुळे परिसरात टपरी व्यवसाय फोफावला आहे. अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वःताच उदरनिर्वाह भागविण्यासाठी प्रत्येकाने दोन-तीन टप-या टाकल्या आहेत. त्या टप-या प्रतिमहा आठ ते दहा हजार रुपये भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या टपरी मालकाला वीस ते पंचवीस हजार भाडेपोटी गोळा होत आहेत. त्या टप-या

अनधिकृत असतानाही महापालिका प्रशासन कुठलाही प्रकारे कारवाई करीत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या.
दरम्यान, संत तुकारामनगर परिसरातील अवैध टप-यावर गेल्या दोन दिवसापासून महापालिका अतिक्रमण पथकाकडून धडक कारवाई सुरु आहे. परंतू, अवैध टप-यावर कारवाई करताना अनेक टपरी मालकांकडून प्रशासनाच्या कारवाईत अडथळा आणला जात आहे. तसेच अतिक्रमण पथकाचे अधिकारी देखील टपरी कोणाची आहे, हे पाहून कारवाई करु लागल्याचे चित्र दिसत आहे. परंतू, काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या टप-या वगळून अन्यत्र टप-यावर कारवाई करण्यात येवू लागली आहे. ही कारवाई ह व ई क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाकडून संयुक्तपणे सुरु आहे.

Exit mobile version