breaking-newsराष्ट्रिय

अल्पवयीन फ्रेंच विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, पोलिसात तक्रार दाखल

दिल्लीत स्टुडंट एक्स्चेंज कार्यक्रमासाठी आलेल्या एका अल्पवयीन फ्रेंच मुलीने तिचा तिच्या मित्राच्या वडिलांनी लैंगिक छळ केल्याचे म्हटले आहे. तसेच यासंदर्भात तिने दिल्ली पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. दिल्लीमध्ये ही फ्रेंच मुलगी तिच्या ज्या मित्राच्या घरी उतरली होती तिथे त्याच्या वडिलांनी आपल्यासोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचे या मुलीने म्हटले आहे. या संदर्भात या मुलीने १८ ऑक्टोबरला तक्रार दाखल केल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. आम्ही या मुलीच्या सांगण्यावरून तक्रार नोंदवली असून पुढील चौकशी सुरु आहे अशी माहिती सह पोलीस आयुक्त देवेश श्रीवास्तव यांनी दिली आहे.

याप्रकरणी फ्रेंच दुतावासाला कल्पना देण्यात आली असून या दुतावासातले अधिकारी या मुलीच्या पालकांच्या संपर्कात आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पीडित फ्रेंच मुलीने मॅजिस्ट्रेटसमोरही तिच्यासोबत काय घडले त्याची कल्पना दिली आहे. या मुलीचा लैंगिक छळ करणारा आरोपी दिल्ली सोडून पळाला आहे आम्ही लवकरच त्याला अटक करू असेही पोलिसांनी म्हटले आहे. या मुलीच्या राहण्याची व्यवस्थाही दुसऱ्या घरी करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

पीडित फ्रेंच मुलीने तिच्यासोबत काय घडले ते तिच्या काही मित्रांना सांगितले होते. एवढेच नाही तिने महिला शिक्षकांनाही याबाबत कल्पना दिली होती. ज्यानंतर फ्रेंच शिकवणाऱ्या प्राध्यपकांनी ही गोष्ट दुतावासात सांगितली. मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या नराधमाविरोधात २३ ऑक्टोबरला गुन्हा नोंदवण्यात आला. मे जून मध्ये फ्रान्समध्ये स्टुडंट एक्स्चेंज कार्यक्रम झाला होता तेव्हा दिल्लीतली काही मुलं या मुलीच्या घरी राहिली होती. आत्ता दिल्लीत जेव्हा स्टुडंट एक्स्चेंज सुरू असताना ही मुलगी तिच्या मित्राकडे येऊन राहिली. मात्र या मित्राच्या वडिलांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button