breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अर्ज 60 हजार; यादी 666 उमेदवारांची

  • वर्षभर प्रतीक्षा : पीएमपी वाहकभरतीतील उमेदवारांचा नाराजीचा सूर

पुणे –पीएमपीएमएलने वर्षभरापूर्वी 4 हजार 900 बंदली हंगामी वाहक पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यासाठी राज्यभरातून जवळपास 60 हजार इच्छूकांनी अर्ज केले होते. यानंतर सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पीएमपीने फक्त 666 उमेदवारांची यादी संकेस्थळावर जाहीर केल्याने प्रशासनाविरोधात काही उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

यासंदर्भात नाराजी व्यक्‍त करत काही उमेदवारांनी सोमवारी (दि.4) प्रशासनाला निवेदन दिले असून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येत्या बुधवारी (दि.6) राज्यभरातील नाराज उमेदवार पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयात येणार आहेत. गेल्यावर्षी पीमपीने बदली रोजंदारी वाहक पदाच्या एकूण 4 हजार 900 जागांसाठी जाहिरात दिली होती. त्यानूसार राज्यभरातील सुुमारे 60 हजारांहून अधिक उमेदवारांनी यासाठी अर्ज करुन परीक्षा दिली होती. प्रत्यक्षात 4 हजार 900 जागा असताना फक्‍त 666 नावांचीच यादी जाहीर केलेल्या निवड होण्याची खात्री असलेल्या हजारो उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. मागील वर्षभर यादीच्या प्रतिक्षेत असल्याने या उमेदवारांना धक्का बसला आहे. यापुढील काळात उर्वरीत जागा भरल्या जाणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पीएमपी प्रशासनावर नाराज असलेले उमेदवार येत्या बुधवारी स्वारगेट येथील कार्यालयात एकत्र जमणार आहेत.

गरजेनुसार करणार भरती

पीएमपीने 4 हजार 900 जागांसाठी जाहिरात दिली होती. परीक्षा घेताना पुढील काळात शहरातील रस्त्यावर 3 हजार बसेस धावतील आणि वाहकांची जास्त गरज पडेल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात 1400 ते 1500 बसेसच रस्तावर धावत आहेत. त्यामुळे जादा वाहकाची सध्या गरज नसल्याने सुरूवातीच्या टप्प्यात 666 पदांची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, यापुढील काळात गरजेनुसार पदभरती करणार असल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासनाकडून लेखी घेणार
पुढील काळात पीएमपीमध्ये नवीन बस आल्याशिवाय भरती होणार नाही. या बस कधी येणार याचा निश्‍चित कालावधी नाही. त्यामुळे भरतीसाठी आणखी किती वर्ष थांबावे लागेल, याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे बुधवारी अनेक परीक्षार्थी येणार आहेत. याबाबत पीएमपीचे लेखी म्हणणे घेणार असल्याचे एका परीक्षार्थीने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button