breaking-newsराष्ट्रिय
अयोध्याप्रकरणी आज सुनावणी

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात सौहार्दपूर्ण समेट होण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्चला हे प्रकरण मध्यस्थीसाठी समितीकडे सोपवण्याचा आदेश दिला होता. निवृत्त न्यायाधीश एफ एम कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, तसेच ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे दोन सदस्य आहेत. या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ सुनावणी घेणार आहे.