Mahaenews

अमेरिकेत 2 लाखांपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थी

Share On

वॉशिंग्टन (अमेरिका)- अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 2 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार अमेरिकेतील वेगवेगळ्या विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 2,11.703 आहे. या बाबतीत भारताचा क्रमांक 2 रा लागतो. प्रथम क्रमांकावर चीन आहे. चीनचे सुमारे 3,77,070 विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत.

अमेरिकेतील एफ आणि एम विद्यार्थ्यांपैकी 49 टक्के विद्यार्थी चीन आणि भारताचे आहेत. दोन्ही देशातील विद्यार्थ्यांच्या संख्येत या वर्षी 1 ते 2 टक्के वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे या वर्षी चीनचे 6,305 तर भारताचे 2,356 अधिक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी आले आहेत. अमेरिकेतील एकूण परदेशी विद्यार्थ्यांमध्ये 77 टक्के विद्यार्थी एशिया खंडातील आहेत.

Exit mobile version