breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत ज्यूंच्या धार्मिक स्थळावर गोळीबारात 11 ठार

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत ज्यूंच्या धार्मिक स्थळावर गोळीबारात 11 ठार आणि 4 जण जखमी झाले आहेत. पिट्‌सबर्ग शहरातील ज्यूंच्या ट्री ऑफ लाईफ या धार्मिक स्थळावर (सिनेगॉग) शनिवारी गोळीबार करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने लोक प्रार्थनेसाठी जमा झाले होते. त्यामध्ये एफबीआयचे एजंटही होते. प्रार्थना चालू असताना गोळीबार झाला.

एक दाढीधारी श्‍वेत व्यक्ती हाती बंदूक घेऊन सिनेगॉगमध्ये शिरली आणि सर्व ज्यू मेलेच पाहिजेत अशा घोषणा देत त्यानी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात अकरा जण मरण पावले आणि चार जण जखमी झाले. जखमींमध्ये तीन पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या हल्लेखोराला नंतर अटक करण्यात आली असून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प हे साऱ्या घटनाक्रमावर लक्ष ठेवून असल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्या सारा सॅंडर्स यांनी म्हटले आहे. सामूहिक हत्याकांड करणाराल मृत्युदंड देण्याची शिफारस डोनॉल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button