अमेरिका पॅसिफिक कमांडचे नाव झाले हिंद पॅसेफिक कमांड

वॉशिंग्टन (अमेरिका) -ट्रम्प प्रशासनाने आपल्या अमेरिका पॅसेफिक कमांडचे नाव बदलून हिंद पॅसेफिक कमांड असे केले आहे. एका दृष्टीने ट्रम्प प्रशासनाने भारताचा गौरव करणारी ही एक भेट दिली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्थापन करण्यात आलेली अमेरिका पॅसेफिक कमांड यापुढे हिंद पॅसेफिक कमांड म्हणून ओळखली जाणार आहे. या बदलाने अमेरिकेच्या रणनीतीमध्ये असणारे हिंद महासागराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
सत्तेवर आल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने एशिया-पॅसेफिकचे नाव बदलून भारत-पॅसेफिक असे केले आणि भारताला एक खास दर्जा दिला. पर्ल हार्बर बंदरात अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी चेंज ऑफ गार्ड समारोहात ही घोषणा केली होती. या कार्यक्रमात ऍडमिरल फिल डेव्हिडसन यांनी हिंद पॅसेफिक कमांडचे कमांड़र म्हणून हॅरी हॅरिस यांच्याकडून सूत्रे स्वीकारली होती. पॅसेफिक देशांबरोबर अधिक सहकार्य करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याची घोषणा जेम्स मॅटिस यांनी केली होती. जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय सागरी युद्धाभ्यासात चीनला दिलेले निमंत्रण रद्द केल्यानंतर जेम्स मॅटिस यांनी ही घोषणा केली होती.