breaking-newsमुंबई

अमित शाह म्हणजे नरकासूर, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात अमित शाह यांना नरकासुराच्या रुपात दाखवण्यात आले आहे. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. तो दिवस आजचा होता त्याचमुळे नरकचतुर्दशी साजरी केली जाते. नरकासुराचे प्रतीक म्हणून चिरांटे नावाचे काटेरी फळ पायाखाली चिरडण्याची प्रथा आहे. त्याच चिरांटे फळाच्या रुपात अमित शाह यांना दाखवण्यात आले आहे. भाजपा कार्यकर्त्यांना अमित शाह रुपी नरकासुराला चिरडण्याचे स्वप्न पडताना या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. अत्यंत समर्पक असे हे व्यंगचित्र आहे.

दिवाळी असल्याने रोजच राज ठाकरेंची व्यंगचित्रे बघायला मिळणार आहेत. कारण ट्विटर आणि फेसबुकवर आपण व्यंगचित्रे पोस्ट करणार आहोत असे राज ठाकरेंनी जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यंगचित्रांची मालिकाच बघायला मिळणार आहे. धनत्रयोदशीच्या निमित्तानेही त्यांनी व्यंगचित्र काढले होते ज्यामध्ये देश आयसीयूत गेल्याचे दाखवण्यात आले. आता अमित शाह यांना नरकासुराची उपमा देण्यात आली आहे. भाजपा हा पक्ष झोपला आहे असे दाखवण्यात आले असून हा पक्षच अमित शाह यांना स्वप्नात चिरडताना दाखवण्यात आला आहे. अमित शाह असोत किंवा भाजपा या सगळ्यांनाच हे व्यंगचित्र झोंबणारे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button