breaking-newsराष्ट्रिय

अमित शहांच्या बैठकांचा सामान्यांना मनस्ताप

नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा गेले दोन दिवस महाराष्ट्र सदनात भाजप आणि संघ कार्यकर्त्यांशी दिवसभर विचारमंथन करीत आहेत. मात्र, त्यांच्या महाराष्ट्र सदनातील वावराचा सदनात येणाऱ्या सामान्य नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. शहा यांच्यासाठी सदनात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अमित शहा हे सोमवारपासून महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या कक्षात ठाण मांडून बसले आहेत. शहा यांच्या बैठकांचे सत्र आज, बुधवार आणि गुरुवार असे आणखी दोन दिवसही सुरू राहणार असून शहा यांच्या सुरक्षा यंत्रणेचा जाच सामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे. वास्तविक, दीनदयाळ उपाध्याय मार्गावर भाजपचे पाच मजली आलिशान मुख्यालय आहे. तिथे अनेक पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. या मुख्यालयात भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचे विचारमंथन न घेता ते महाराष्ट्र सदनात का घेतले गेले आहे, असा सवाल येथे आलेले लोक करताना दिसत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button