अमित शहांची माजी लष्कर प्रमुखांशी चर्चा

नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी माजी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तथापी भाजपच्या संपर्क से समर्थन या अभियाना अंतर्गत त्यांनी माजी लष्कर प्रमुखांशक्ष भेट घेतल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमा अंतर्गत अमित शहा हे देशातील किमान 50 प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी घेणार आहेत असेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या पासून ते थेट पंचायत समिती सदस्यांपर्यंत सुमारे चार हजार लोकप्रतिनिधी या अभियाना अंतर्गत विविध क्षेत्रातील सुमारे एक लाख प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मोदी सरकारने चार वर्षात केलेल्या कामांची माहिती देणार आहेत. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.