breaking-newsराष्ट्रिय
अमरनाथ यात्रेसाठी हवेत 22500 जादा जवान

नवी दिल्ली – जम्मू काश्मीर पोलिसांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे 22500 अतिरीक्त जवानांची मागणी केली आहे. संपुर्ण अमरनाथ यात्रा मार्गावर बहुपदरी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी या जवानांची आवश्यकता आहे असे त्यांनी कळवले आहे. येत्या 28 जून पासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेची यावेळी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी उपग्रह, सीसीटीव्ही कॅमेरे, बुलेटप्रुफ बंकर्स, स्फोटके शोधक श्वान पथक, जलद प्रतिसाद सुरक्षा पथकांची नेमणूक इत्यादी उपाययोजना यानिमीत्ताने केली जात आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काश्मीर दौऱ्याच्यावेळी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेतला. त्यावेळी या सुरक्षेसाठी एकूण चाळीस हजार सुरक्षा जवानांची गरज आहे असे सांगण्यात आले होते.