breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अमरनाथ यात्रेला जाणारी बस दरीत कोसळली; ११ प्रवाशांचा मृत्यू

श्रीनगर – जम्मू काश्‍मीर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक भाविका जखमी झाले आहेत. घटनेती माहिती मिळताच लष्कराने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळावर लष्कराकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांना घेऊन जाणारी बस अमरनाथ येथे जात होती. त्यावेळी रामबन जिल्ह्यात जम्मू काश्‍मीर राष्ट्रीय महामार्गावर बस दरीत कोसळली. यामुळे 11 यात्रेकरूंवर काळाने झडप घातली आहे. तर अपघातामुळे 36 यात्रेकरू जखमी झाले आहेत. घटनास्थळी, बचाव कार्यासाठी तात्काळ लष्कराला पाचारण करण्यात आले होते. लष्कराच्या जवानांकडून बचाव कार्याला सुरूवात करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिकांकडूनही मदत कार्य करण्यात येत आहे. बचावलेल्या भाविकांना नजीकच्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मागच्या आठवड्यात अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी केलेल्या हल्ल्यात 6 भाविक ठार झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button