अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया आजपासून

- अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध
पुणे – नीट व एमएच- सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यापासून राज्य चाचणी कक्षाकडून विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. कक्षाकडून वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून दोन्हींसाठी गुरूवार (दि.7) पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. वैद्यकीयसाठी 17 तर अभियांत्रिकीसाठी 19 जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू करण्याचा निर्णय कक्षाने घेतला असून ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी संकेतस्थळ सुरू होणार आहेत. अभियांत्रिकीसाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया 7 ते 19 जून या कालावधीत सुरु राहणार आहे. तर वैद्यकीयसाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया 7 ते 17 जून या कालावधीत सुरू असेल. यानतर पुढील एक दिवसात (दि.18) पर्यंत स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये यासंबंधीचे शुल्क भरावे लागणार आहे. यानंतर 19 जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादीनंतर पसंती क्रम अर्ज भरणे, पहिल्या फेरीची निवड यादी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश अशी प्रक्रिया असेल.
दरम्यान, वैद्यकीय प्रवेसासाठी अर्ज भरताना त्यामध्ये केवळ नीट ऑल इंडिया रॅंक नमुद करावा लागणार असून बॅंकेमध्ये चलन भरल्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. त्याचबरोबर अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असून कागदपत्रांच्या पडताळणीवेळी ही सर्व कागदपत्रे संबंधित केंद्रावर दाखवाली लागतील.कक्षाकडून पहिल्या फेरीपर्यंतचे वेळापत्रक देण्यात आले असून 1 ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत.
वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रक
ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरणे – दि. 7 ते 17 जून
नोंदणी शुल्क भरण्याची अंतिम मुदत – दि. 18 जून
तात्पुरती गुणवत्ता यादी – दि. 19 जून (सायंकाळी 5 वाजेनंतर)
कागदपत्रांची पडताळणी – दि. 21 ते 25 जून
सुधारित तात्पुरती गुणवत्ता यादी – दि. 26 जून
ऑनलाईन पसंती क्रम अर्ज भरणे – दि. 26 ते 29 जून
पहिल्या फेरीची निवड यादी प्रसिध्द करणे – दि. 2 जुलै
पहिल्या फेरीनुसार महाविद्यालयात प्रवेश घेणे – दि. 12 जुलैपर्यंत
अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक –
ऑनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती – दि. 7 ते 19 जून
तात्पुरती गुणवत्ता यादी – दि. 21 जून
यादीवर हरकती – दि. 22 व 23 जून
अंतिम गुणवत्ता यादी व पहिल्या फेरीसाठी जागांची स्थिती – दि. 24 जून
ऑनलाईन पसंती क्रम – दि. 25 ते 28 जून
कॅप 1 ची निवड यादी – दि. 29 जून
एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती – दि. 30 जून ते 4 जुलै
दुसजया फेरीसाठी रिक्त जागा – दि. 5 जूलै
ऑनलाईन पसंती क्रम – दि. 6 ते 8 जुलै
कॅप 2 निवड यादी – दि. 9 जुलै
एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती – दि. 10 ते 12 जुलै
कॅप 3 साठी रिक्त जागा – दि. 13 जुलै
ऑनलाईन पसंती क्रम – दि. 14 ते 16 जुलै
कॅप 3 निवड यादी – दि. 17 जुलै
एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती – दि. 18 ते 20 जुलै