breaking-newsमनोरंजन

अभिनेत्री निकेशा पटेल आणि प्रभूदेवा विवाहबंधनात अडकणार ?

दाक्षिणात्य अभिनेत्री निकेशा पटेल हिने डान्स मास्टर आणि कोरिओग्राफर प्रभूदेवाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळेच ती सध्या ट्रेण्ड होत आहे. प्रभूदेवा आणि निकेशा लग्न करतायत की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

निकेशाला त्याबद्दल विचारण्यासाठी अनेकांचे फोन आणि मेसेज येऊ लागले. या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अखेर निकेशाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. ‘प्रभूदेवासोबत चित्रपटात काम करण्याविषयी तुम्ही मला विचारत आहात, पण माझा तर त्यांच्याशी लग्न करण्याचा विचार आहे,’ असं ती म्हणाली होती. त्यावर स्पष्टीकरण देत निकेशाने ट्विट केलं की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला येणाऱ्या सतत फोनकॉल्समुळे मी वैतागले आहे. प्रभूदेवा यांच्याशी मी लग्न करण्याच्या चर्चा खोट्या आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button