breaking-newsमहाराष्ट्र
अबब चार किलोचा केशर आंबा !

तुळजापूर : एक फूट लांब आणि तब्बल चार किलो वजन असलेला केशर आंबा अनेकांच्या भुवया उंचावून जात आहे. हा आंबा पाहण्यासाठी आता अनेक जण गर्दी करू लागले आहेत. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ओम अंगुले यांच्या शेतातील केशर आंब्याच्या झाडाला चार किलो वजनाचे आंबे लागले आहेत.
पाण्याचे योग्य नियोजन, झाडांची शास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेली काळजी आणि निसर्गातील विविध घटकांची योग्य साथ लाभल्यास, असे विक्रमी उत्पन्न सहज पदरात पडू शकते, अशी प्रतिक्रिया अंगुले यांनी दिली. त्यांच्या बागेतून एकरी पाच लाखापर्यंतचे उत्पन्न यंदा मिळू शकेल असा त्यांचा अंदाज आहे.