Mahaenews

अफगाणिस्तानात सहा भारतीयांचं अपहरण

Share On

काबूल : अफगाणिस्तानच्या बागलान प्रांतात शस्त्रधारींनी सहा भारतीय आणि एका अफगाणी कर्मचाऱ्याचं अपहरण केलं आहे. टोलो न्यूजने हे वृत्त दिले आहे. अफगाणिस्तान मधील एका न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार बागलान प्रातांतून या सहा जणांचं अपहरण करण्यात आलं. हे सहा जण एका कंपनीतले कर्मचारी आहेत. या अपहरणामागे तालिबानचा हात असल्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. अद्याप या अपहरणाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

Exit mobile version