breaking-newsआंतरराष्टीय
अफगाणिस्तानात क्रिकेट सामन्यावेळी स्फोट ; आठ ठार

काबुल – अफगाणिस्तानच्या पुर्वेकडील ननगरहर प्रांतात क्रिकेटचा सामना सुरू असताना त्या मैदानात झालेल्या अनेक बॉंबस्फोटांमध्ये किमान आठ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. या प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते आत्ताहुल्लाह खोगयानी यांनी सांगितले की काल रात्री ही घटना घडली त्यात अन्य 45 जण जखमी झाले आहेत.
रमझानच्या महिन्या निमीत्त येथे याल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या असून त्या रात्रीच्यावेळी घेतल्या जातात. काल रात्री हा स्फोट झाला त्यावेळी तेथे शेकडो दर्शक आणि खेळाडू उपस्थित होते. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने अद्याप स्वीकारलेली नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. तथापी काही इस्लामिक कट्टरपंथीयांचा क्रिकेटलाही विरोध असल्याने त्यांच्या सुचनेवरूनच हे स्फोट घडवण्यात आल्याचे वृत्त आहे.