breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानमध्ये भीषण स्फोटात 16 ठार; 38 जखमी

मिनीव्हॅनमधील स्फोटकांना निकामी करण्याच्या प्रयत्नात स्फोट

कानदहार, (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये स्फोटकांनी भरलेल्या मिनीव्हॅनच्या स्फोटामध्ये किमान 16 जण ठार झाले आणि 38 जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील कानदहारमध्ये एका बस स्थानकाच्या परिसरामध्ये ही मिनीव्हॅन आढळून आली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटके असल्याचे आढळून आल्यावर सुरक्षा रक्षकांनी बस स्थानकाचा परिसर रिकामा केला होता आणि स्फोटके निकामी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हा स्फोट झाला, असे गव्हर्नरच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.

ताज्या आकडेवारीनुसार या स्फोटात किमान 16 जण ठार झाले आहेत. तर जखमी झालेल्या 38 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्या आणखी काही जणांना रुग्णालयात आणले जात आहे, असे मिरवाएस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नेहमत बराक यांनी सांगितले. हा स्फोट इतका प्रचंड होता की रिकाम्या केलेल्या बस स्थानकाबाहेरील नागरिकही यामध्ये मरण पावले. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

सुरक्षा दलांना याच घटनास्थळाजवळ स्फोटकांनी भरलेला एक मोठा कंटेनरही सापडला आहे. त्यामध्ये रॉकेटने डागण्याचे ग्रेनेड, आत्मघातकी जॅकेट आणि अन्य दारुगोळाही आढळून आला आहे.
रजझानमहिन्याच्या अखेरीस ईदच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला केला जाण्याची योजना असावी, असा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button